जितेंद्र शिंगाडे, झी मिडिया, नागपूर  : राज व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या गालावर टाळी मारण्या ऐवजी टाळी मारायचीच असेल तर हातावर टाळी मारावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवले नागपुरात बोलत होते. राज ठाकरे यांचे नगरसेवक शिवसेनेत गेल्याने सध्या मनसे आणि सेनेत जो वाद पेटलाय त्यावर बोलताना आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी स्वच्छ राजकारण केले आहे.  जे गेले ते नगरसेवक मुळचे शिवसैनिकच होते.


राज ठाकरे यांना त्यांचे नगरसेवक सांभाळता आले नाही त्यामुळेच ते सहा नगरसेवक शिवसेनेत गेले... त्यामुळे गालावर टाळी देण्याऐवजी टाळी मारायचीच असेल तर दोघांनीही हातावर टाळी द्यावी असे आठवले म्हणाले. 


मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने त्यांना पक्षप्रवेश दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर  राज ठाकरे यांनी रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत फुटलेले नगरसेवक आणि शिवसेनेचे राजकारण यावर सविस्तर प्रतिक्रीया दिली. 


महाराष्ट्राशी प्रतारणा करणारे दळभद्री राजकारण मी करत नाही. मदत मागितली असती तर, स्वत:हून केली असती. शिवसेनेकडून असल्या राजकारणाची अपेक्षा नव्हती, अशी खंत व्यक्त करत आता हातावर नाही, तर गालावर टाळी मिळेल, असा सज्जड इशारा राज ठाकरेंनी शिवसेनेला दिला.