बारामती : एकनाथ खडसे आरपीआय मध्ये यायला पाहिजे होते असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हटलंय. एकनाथ खडसेंसोबत पंधरा-सोळा आमदार असणार नाहीत. सध्या आमदार नसल्यामुळे राष्ट्रवादी त्यांना पहिल्यांदा आमदार करतील आणि नंतर त्यांना मंत्रिपद मिळू शकते असे आठवले म्हणाले. खडसेंनी पक्ष बदलायला नको होता. आरपीआयमध्ये यायला पाहिजे होते असे ते म्हणाले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असे केंद्रीय मंत्री म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले बारामती दौऱ्यावर आहेत. या वेळेत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले



पुणे जिल्ह्यात बारामती, दौंड, इंदापूर तसेच सोलापूर भागांमध्ये पावसामुळे अतोनात नुकसान झालंय. मानवी वस्तीसह शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.


या ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत तसेच एकरी पन्नास हजार रुपये मिळावेत अशी आमची मागणी आठवलेंनी केलीय. केंद्र सरकार मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेच पण यामध्ये राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे असे रामदास आठवले म्हणाले.