मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडानंतर ठाकरे गट आणि शिंदे (Thackeray vs Shinde) गटात वाकयुद्ध सुरू आहे. शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर कडाडून टीका करत हल्लाबोल केलाय. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार देखील रोखठोक प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी थेट आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर शाब्दिक प्रहार केलाय.  (Ramdas Kadam called Bhaskar Jadhav a Chipluncha Nachya)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाने दापोलीमध्ये एक जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी रामदास कदम यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र चढवलं. रामदास कदम यांनी  भास्कर जाधव यांचा 'चिपळूणचा नाच्या' (Chipluncha Nachya) असा उल्लेख केला आहे.


हा इथं येऊन नुसता नाचतोय. नाच्याच ना?,  रामदास कदमवर जे कोणी बोललेत ना, ते सगळे उध्वस्त झालेत, तुम्ही पण उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं देखील रामदास कदम म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी युतीमधून निवडून येऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार उभा केला, त्यांनी पहिला राजीनामा द्यावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती.


आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल- 


आदित्य ठाकरे यांनाच शंभर खोके घ्यायची सवय असल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांननी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या शंभर खोक्यांची पोलखोल करणार असल्याचं देखील कदम यावेळी म्हणाले आहेत.


काय म्हणाले होते भास्कर जाधव-


आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असताना भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. भास्कर जाधव यांनी एकनाथ कदम यांचा उल्लेख गद्दार असा केला. रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आणि त्यावेळी रामदास कदम माध्यमांसमोर येऊन डोळ्यात ग्रीसलीन टाकून ढसाढसा रडण्याचं फक्त नाटक करत होते, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला होता. रामदास कदम यांच्यासारखा खोटा माणूस उभ्या भारतात सापडणार नाही, असंही कदम म्हणाले होते. त्यावर कदमांनी आज प्रत्युत्तर दिलंय.


पाहा व्हिडीओ-