मुंबई : रामदास कदम यांनी काल रत्नागिरीत कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान नारायण राणेंवर टीका केली होती. आता नारायण राणे- रामदास कदम यांच्यात सुरु असलेल्या वादात नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. या ट्विटमधून त्यांनी रामदास कदमावंर टीका केली आहे. राणे हे कोकणाला लागलेला डाग असून हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही." अशी टीका त्यांनी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामदास कदमांच्या टीकेला नारायण राणेंचे पुत्र आणि  काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी आक्रमक शैलीत उत्तर दिलं आहे. "पर्यावरण मंत्री रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांनी पाळलेलं कुत्रं आहे असा टोला नितेश राणेंनी लगावला. 'स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना कुत्रे आवडायचे.  तसेच राज ठाकरे यांना सुद्धा कुत्रे आवडतात. हीच परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुरु ठेवली आहे. रामदास कदम सतत भुंकत असतात, पण त्यांना हे माहित नाही की, भुकणारे कुत्रे कधी चावत नाही". अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी ट्विटवर केली आहे.


 




कदमांच उत्तर


नितेश राणेंनी केलेल्या या ट्वीट बद्दल रामदास कदम यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा 'नारायण राणे बोलले असते तर, बघितलं असतं. मी त्या कुत्र्याच्या पिल्लाला का उत्तर देऊ ?' असं ते शिवसेना भवनातील बैठकी दरम्यान म्हणाले. 


काय आहे प्रकरण ?


शुक्रवारी रत्नागिरीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान रामदास कदम यांनी राणेंवर कडाडून टीका केली. "नारायण राणे हे कोकणाला लागलेला डाग आहे. नारायण राणेंनी आत्तापर्यंत अनेक पक्ष बदलले, त्यांच्यासाठी आता रामदास आठवलेंचा पक्ष बाकी राहिलाय' असं म्हणत राणेंची खिल्ली उडवली होती. 'शिवसेनेच्या जोरावर राणे पिता-पुत्रांनी कोट्यावधींची संपत्ती कमावली. ते सतत मातोश्रीवर टीका करतात, त्यांची औकात आहे का ?' असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी राणेंना विचारला.