Ramnavami 2021 | रामनवमी उत्सवाबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
रामनवमी उत्सवासाठी देखील राज्य सरकारने मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत.
मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रामनवमी उत्सवासाठी देखील राज्य सरकारने मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. रामनवमी अत्यंत साधेपणाने घरातच साजरी करावी. गर्दी आणि मिरवणूकांना परवानगी नसणार आहे. नक्की काय म्हटलंय सरकारने सूचनांमध्ये पुढे वाचा
रामनवमीसाठी मार्गदर्शक सूचना
1 सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता, आपआपल्या घरी साधेपणाने साजरी करणे
2 मंदिंरांमध्ये भजन, किर्तन, सार्वजनिक पूजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.
3 मंदिर व्यवस्थापनांनी शक्य असल्यास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी.
4 कोणत्याही प्रभातफेरी, मिरवणूका काढण्यात येऊ नये
5 स्थानिक पातळीवर प्रशासनाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे काटेकोर पालन करावे