मुंबई : राज्य मंत्री मंडळाचा विस्तार होणार ही चर्चा गेले काही दिवस सुरु होती. पण हा विस्तार लवकरच होणार असून त्यात नारायण राणे यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. 


राणेंचे नाव आघाडीवर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारात पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्या पैकी कोणाची तरी मंत्री पदी वर्णी लागणार यात चर्चा रंगली होती. या स्पर्धेत राणेंचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. 


पैजा लागल्या


आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे या दोघांचेही समर्थक आपल्याच नेत्याला मंत्री पद मिळणार यावर पैजा लावात होते.  


पुन्हा प्रतिक्षा 


कित्येक दिवस मंत्री पदाची स्वप्ने पाहणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नारायण राणे आणि त्या अनुषंगाने राज्य पातळीवर घडलेल्या घडामोडींमुळे पुन्हा प्रतीक्षाच करावी लागतेय.