कोल्हापूर :  नव्वद वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याप्रकरणी ५२ वर्षीय आरोपी विष्णू नलवडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज हा निकाल दिला आहे.


वृद्धेला जबरदस्त मानसिक धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुदरगड तालुक्यातील नागणवाडी गावांमध्ये ४ मार्च २०१५ रोजी अंथरुणाला खिळलेल्या वृद्धेवर विकृत आरोपीने बलात्कार केला होता. पिडीत वृद्धेच्या शेजाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.या घटनेनंतर वृद्धेला जबरदस्त मानसिक धक्का बसला. 


 अंधारात राहणे पसंद केलं 


मानसिक धक्क्यात बसलेल्या या वृद्धेनेनंतर कोणाचीही भेट न घेता अंधारात राहणे पसंद केल होतं. यातच सहा महिन्यांनी तिचा मृत्यू झाला. या घटनेत एकूण नऊ साक्षीदार तपासून न्यायालयाने हा निकाल दिला. 


 जन्मठेपेची शिक्षा सुनावली


सरकारी वकिलांनी युक्तिवाद मांडताना हे कृत्य जाणूनबुजून आणि पूर्वनियोजित असल्याचं सांगत आरोपीला जास्तीजास्त शिक्षा व्हावी म्हणून मागणी केली. यावर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी आरोपी विष्णू नलावडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.