लातूरमध्ये ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात धक्कादायक घडली. एका 45 वर्षीय महिलेचं अपहरण करून तीन तरूणांनी बलात्कार केल्याची घटना घडलीय. त्यानंतर त्या तीन नराधमांनी त्या पीडित महिलेसोबत अमानवी कृत्य केलं. उदगीर शहरातील शेल्लाळ रोड परिसरात ही धक्कादायक घडली.
लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात धक्कादायक घडली. एका 45 वर्षीय महिलेचं अपहरण करून तीन तरूणांनी बलात्कार केल्याची घटना घडलीय. त्यानंतर त्या तीन नराधमांनी त्या पीडित महिलेसोबत अमानवी कृत्य केलं. उदगीर शहरातील शेल्लाळ रोड परिसरात ही धक्कादायक घडली.
45 वर्षीय पीडित महिला 13 जुलै रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास रिक्षाने घरी जाण्यास निघाली होती. त्याचवेळी तीन तरूणांनी तिचं अपहरण करून शेल्लाळ रोड परिसरात नेलं. तिथे तिघांनी बलात्कार केला आणि त्यानंतर गुप्तांगात खडे टाकल्याचा जबाब पीडित महिलेने पोलिसांना दिला.
महिलेच्या जबाबावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींवर बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी पिडीत महिलेचा घटस्फोटीत पती आणि अन्य एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतलंय. पोटगीसाठी पीडित महिला आणि तिचा घटस्फोटीत पती यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. त्यामुळे या घटनेशी त्याचा काही संबंध आहे का याचाही पोलीस शोध घेताहेत.