पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वेगामुळे एकाचा बळी गेला आहे. शहरातील नवी सांगवी परिसरातील अनंत भोजनालयात फॉर्च्युनर कार घुसलीय. भरधाव वेगाने येणारी कार थेट या भोजनालयात घुसली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झालाय तर ३ जण गंभीर जखमी झालेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेत, ओमप्रकाश पंदीलवार यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं ६० वर्ष होतं, ते या हॉटेलचे मालक असल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रायव्हरच नाव अजून समजू शकलेलं नाही. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण का सुटलं हे स्पष्ट झालेलं नाही. पण ज्या पद्धतीने ही कार भोजनालयात घुसली, तेव्हा ही घटना अतिशय थरारक आणि भीतीदायक असल्याचं म्हटलं जात आहे.