ठाणे :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात (Thane) आज शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) एन्ट्री करणार आहेत. ठाणे नगरीत रश्मी ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. रश्मी उद्धव ठाकरे यांचे ठाणे नगरीत स्वागत असे मजूकर असलेले फलक मुलुंड चेकनाक्यापासून लावण्यात आलेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) आणि त्यांच्या पत्नी शिवसेना नगरसेविका नंदिनी विचारे (Nandini Vichare) यांच्यावतीने ठाण्यात आज महा मंगळागौर या कार्यक्रमाचं आजोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 


राज्यातील सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव  ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सभा किंवा दौरा झालेला नाही. पण आज रश्मी ठाकरे ठाण्यात उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील कापूर बावडी इथल्या हाय स्ट्रीट मॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला त्या उपस्थितीत लावणार आहेत. 


बंडानंतर ठाकरे कुटुंब मैदानात
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडाननंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब मैदानात उतरलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, राज्यातील शिवसेना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदारांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तर आदित्य ठाकरे शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. 


त्यानंतर आता रश्मी ठाकरेही मैदानात उतरल्या आहेत. बंडखोरांविरोधात रश्मी ठाकरे बोलणाकर का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आता अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे राज्यभर 'महाप्रबोधन यात्रा' सुरु करणार आहेत. याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या ठाण्यातील टेंभी नाक्यावर पहिली सभा घेऊन सुरु करणार आहेत.