रत्नागिरी : कोरोना व्हायरस जगभरात धुमाकुळ घालत आहे. या व्हायरसचा सगळ्यांनीच धसका घेतला आहे. सध्या कोरोना संदर्भातील अफवा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. चिकन खल्याने कोरोना होतो या अफवेमुळे सध्या चिकन व्यवसायाला उतरती कळा लागली. त्यामुळे  चिकन खल्याने कोरोना होत नाही हे सांगण्यासाठी रत्नागिरीत अनोखी शक्कल लढवण्यात आली. कोरोनाची भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीसोबत चिकन देण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या जनतेमध्ये शिवभोजन थाळी फेमस आहे. त्याचाच वापर यासाठी करण्यात आला. रत्नागिरी एसटी स्टॅण्ड जवळच्या शिवभोजन केंद्रावर शिवभोजन थाळीमधून चक्क चिकनची डिश देण्यात आली. तसेच दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी आता शिवभोजन थाळीत शाहकारी सोबत चिकन देखील दिल जाणार आहे शिवभोजन थाळीच्या दरात म्हणजे दहा रुपयाच्या दरात हि चिकनची  डिश देण्यात येणार आहे.चिकन खल्याने कोरोना होत नाही हे सांगण्यासाठी उपक्रम केला गेला आहे.