मुंबईतून गेलेल्या ११ जणांना कोरोना, रत्नागिरीत आकडा ३२ वर
मुंबईहून आलेल्या ११ जणांना कोरोनाची लागण
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याची चिंता आणखी वाढल्याचे आज दिसून आले आहे. मंडणगडमधील क्वारंटाईन केलेले तब्बल ११ जण कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईहून आलेल्या ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे कळत आहे.
३५ जणांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी २० जणांचे रिपोर्ट आले आहेत.
२० पैकी ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पोचला ३२ वर पोहोचला आहे.
सोमवारपासून एसटी बससेवा सुरु होत आहे. यामुळे हा आकडा अधिक वाढणार का ? अशी भीती व्यक्त केली जात आहे. शहरांमध्ये किमान आरोग्य सुविधा तरी उपलब्ध आहेत. पण ग्रामीण भागात संख्या वाढू लागली तर परिस्थिती बिकट होवू शकते. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळं ही साखळी आणखी मजबूत आणि वाढत जाणार का ? असा प्रश्न उपस्थित होतोयं.