प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोकणातील दशावतार लोककलेला कोरोनामुळे फटका बसला आहे. कलाकारांवर कोरोनामुळे नाट्यप्रयोग रद्द झाल्याने उपासमारिची वेळ आली आहे. कोकणातील पारंपरिक दशवातार लोककलेला ८०० वर्षाच्या कालखंडात कोरोनामुळे पहिल्यांदाच बंद ठेवण्याची वेळ आली असल्याने दशावतार कलाकारांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१००० ते १२०० नाट्य प्रयोग रद्द झाल्याने हि परिस्थिती ओढावली आहे. दशावतार नाट्य प्रयोग रद्द झाल्याने वर्षभर घर खर्च कुठून आणायचा आणि घर कस चालवायच ? असा प्रश्न दशावतार कलाकारांना पडला आहे.



तसेच अशीच परिस्थिती राहिल्यास दशावतार लोककला जपायची कशी असाही प्रश्न या कलाकारांना पडला आहे. कोकणात ९० ते १०० दशावतार नाट्य मंडळ आहेत. एका दशावतार मंडळाची ९० ते १०० नाट्यप्रयोग रद्द झाले असुन साधारणपणे २५०० कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.


कोकण रेल्वेची महत्वाची भूमिका 


लॉकडाऊनच्या काळात आता कोकण रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. कारण देशाच्या विविध कानाकोपऱ्यात जीवनावश्यक वस्तु, औषधं आणि साहित्य पोहोचवले जात आहे. आजच रत्नागिरी स्थानकात देखील कोकण रेल्वेच्या माध्यमातून औषधं उतरवण्यात आली. 


जीवनावश्यक वस्तुंची ने-आण करण्यासाठी विशेष पार्सल ट्रेन चालवली जात आहे. या ट्रेनच्या माध्यमातून ही औषधं आली. यापूर्वी कोकण रेल्वेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तुंची देखील ने आण करण्यात आलेली आहे. शिवाय पुढील दोन दिवसात हापूस आंबा देखील कोकणातून देशाच्या कानाकोपऱ्यात दाखल होणार आहे.