रत्नागिरी : फळांचा राजा म्हणून ज्याची संपूर्ण जगात ओळख आहे, असा रत्नागिरी हापूस स्थानिक बाजारपेठेत दाखल झालाय.  जवळपास अडीच हजार रुपये डझन असा आंब्याचा दर आहे. दरामुळे सर्वसामान्यांच्या हा हापूस आवाक्यात नसला तरीही अनेक जण या हापूसची खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांत कोकणचा हा हापूस वाशी मार्केटमध्ये दाखल झालाय. स्थानिक बाजारात मात्र हापूस काही आला नव्हता. आता आंबा खवय्यांची प्रतीक्षा संपली असून हापूस रत्नागिरीच्या स्थानिक बाजारात दाखल झालाय. रत्नागिरीच्या स्थानिक बाजारात शहरालगतच्या खेडेगावातून हा हापूस येऊ लागलाय. 


पाच ते सात डझन एवढ्या छोट्या प्रमाणात या आंब्याची आवक बाजारात होतेय. रसाळ आणि तेवढाच देखणा रत्नागिरी हापूस स्थानिक बाजारात दाखल असला तरी सर्व सामान्यांच्या खिशाला मात्र हापूस परवडणारा नाही. कारण जवळपास एका डझनासाठी तब्बल अडीच हजार रुपये यासाठी मोजावे लागतायत.