स्पर्धकाचा सुटलेला बाण थेट खेळाडूला लागला
स्पर्धा चालू होण्यापूर्वी सुरक्षा असणे आवश्यक आहे, मात्र ही सुरक्षा नसल्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीत सुरु झालेल्या आर्चरी स्पर्धेला पहिल्याच दिवशी गालबोट लागलं आहे. स्पर्धा चालू असताना एका स्पर्धकाचा सुटलेला बाण स्टेडियमच्या बाहेरून जाणाऱ्या पुण्याच्या नॅशनल खेळाडू जुई ढगे हिच्या हाताला लागला.
जुई ढगेवर उपचार सुरू
यात जुई ढगे जखमी झाली आहे.. तीच्यावर डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात अधिक उपचार चालू आहेत.. महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोशिएशन यांच्या विद्यमानं या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
सुरक्षा असणे आवश्यक
यात अनेक खेळाडू सहभागी झालेत. स्पर्धा चालू होण्यापूर्वी सुरक्षा असणे आवश्यक आहे मात्र ही सुरक्षा नसल्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे.