रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार १ जुलै ते ८ जुलैपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक वाहने फक्त चालू राहणार आहेत.  जिल्ह्यात सर्व दुचाकी, तीन चाकी, चारचाकी बंद (अत्यावश्यक सेवा वगळता) सगळ्या वाहनांवर बंदी आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता १ ते ८ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे अशी घोषणा तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली. रत्नागिरी जिल्ह्यात ११७ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे, याचा प्रसार आता ग्रामीण भागापर्यंत होवू नये या दृष्टीने आमची राज्याच्या मुख्य सचीवांशी चर्चा झाली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब तसेच जिल्ह्याधिकारी यांचे एकत्रित ही व्हिसी झाली आहे.



केवळ अत्याश्यक सेवा वगळता या ब्रेक द चेन या पॅटर्न राबविला जाईल असे उदय सामंत यांनी सांगीतले. यावेळी नाईट कर्फू ची अमलबजावणी अतिशय कडक होईल असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्ह्याथिकारी मिश्रा यांनीही माहिती दिली.
जिल्ह्यात प्लाझामा थेरपी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


सरकारी कर्मचारी १० टक्के कामागावर उपस्थित राहणार आहेत. प्रायव्हेट सेक्टर आठ दिवस बंद राहणार आहे. कन्टनमेंट झोन अधिक कडक करणार असून सर्व नियम पाळले जाणार आहे. 'ब्रेक द चेन' नावाने आठ दिवस पुर्णपणे लॉग डाउन करण्यात येणार आहेत.  लोकांना बाहेर पडण्यास.मज्जाव करण्यात आला असून  सायंकाळी नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.