रत्नागिरीतील भोंदूबाबाच्या मठाची पोलिसांनी घेतली झाडाझडती
रत्नागिरीचा रामरहीम अर्थात पाटीलबाबा याच्या मठाला पोलिसांनी टाळं ठोकलंय. पाटीलबाबाला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
रत्नागिरी : रत्नागिरीचा रामरहीम अर्थात पाटीलबाबा याच्या मठाला पोलिसांनी टाळं ठोकलंय. पाटीलबाबाला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
पोलिसांनी पाटीलबाबाला सोबत घेऊन मठाची झाडाझडती घेतली. यावेळी बाबाने आश्रमचा कोपरा अन् कोपरा दाखवला. यावेळी बाबाच्या समर्थकांची गर्दी होती.
यावेळी आपण साधू, बाबा असल्याचं कधी सांगितलंच नाही असा दावा पाटीलबाबानं केलाय. तसंच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ एडिट केल्याचा दावाही त्याने केलाय.