रत्नागिरी : रत्नगिरी-सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणारा सागरी महामार्गावरचा दांडे पूल खचल्यामुळे आता इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजापूर तालुक्यातल्या अणसुरे गावाजवळच्या या दांडे पुलाला पर्यायी मार्ग म्हणून, आता डोंगर तिठा मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना तब्बल १५ किलोमीटरचा वळसा घलून डोंगर तिठा मार्गे जावं लागणार आहे. या पुलाची उभारणी करून काही वर्षाचा कालावधी उलटून गेलाय. पण उद्घाटनाशिवायच या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती.


रत्नागिरी बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुलाचा खचणारा भाग सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी लाखो रुपये खर्ची घातले गेले. पण पुलाचा भाग मात्र खचण्यापासून रोखण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयशच आलं. पावसाळा संपेपर्यंत या मार्गावरची वाहतूक आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.