COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले नाशिक महापालिकेचे सहाय्यक अभियंता रवी पाटील नाट्यमयरित्या परतले आहेत. कामाच्या दबावामुळं आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून ते गायब झाले होते. नाशिकमधील अनधिकृत लॉन्स कारवाईत रवी पाटील यांचा सहभाग होता. या कारवाईमुळं मनपा प्रशासनाला हायकोर्टानं दणका दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाला जात असल्याचं सांगून ते घराबाहेर  पडले.


तेव्हापासून ते बेपत्ता होते. आता सात दिवसानंतर ते घरी परतल्यानं घरच्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी पाटील यांची भेट घेतली. पाटील यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं आहे. तर आपण अजून मानसिक धक्क्यात आहोत, असं सांगत आपण नक्की कुठं आहोत, हे सांगण्यास रवी पाटील यांनी नकार दिला आहे.