मुंबई : अमरावतीचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना काल मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज वांद्रे न्यायालयात सुनावणीदरम्यान, पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या कोठडीची विनंती केली.  परंतू न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 29 एप्रिलला राणा दाम्पत्याच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खालील कारणास्तव आरोपींची पोलीस कोठडी मिळण्याची विनंती पोलिसांनी कोर्टात केली होती
१) सध्या महाराष्ट्रभर मरिजदवरील भांगे उतरविण्याबाबत आंदोलन काही राजकीय पक्षांनी सुरू केले आहे. अशा स्फोटक परिस्थितीमध्ये आरोपीतांनी मुंबईत मातोश्री बंगला या ठिकाणी येवून हनुमान चालीसा पठण करू असे केवळ आव्हान न करता ते प्रत्यक्ष मुंबईत येवुन स्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे आणखीन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.


२) पोलीसांनी कलम १४९ सीआरपीसी अन्वये शांतता राखणेची नोटीस दिली असताना ती धुडकावुन त्यांनी टीव्ही न्युज, चॅनेल्स व वृत्तपत्रप्रतीनीधी यांना मुलाखती देवून त्यांनी मातोश्री
बंगला येथे हनुमान चालीसा पठण करणारच अशी भडकावू मुलाखत दिली होती. त्याबाबत तपास करावायचा आहे.


३) आज दि. २४/०४/२०२२ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत षण्मुखानंद हॉल येथे दौऱ्यावर येणार आहेत. हे माहित असताना देखील त्या पार्श्वभुमीवर कलानगर व पुर्ण मुंबई व महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण करण्याचा मोठा कट होता याचा तपास करावयाचा आहे.


४) मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. सदर ठिकाणी आरोपीतांनी जाणीवपूर्वक
धार्मिक, राजकिय वाद निर्माण करून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा हेतू होता याबाबत
तपास करावयाचा आहे.


५) सदर गुन्हयामध्ये त्यांचे कोण साथीदार आहेत याचा तपास करावयाचा आहे.


६) गुन्ह्यातील आरोपीतांना सदर गुन्हा करण्यासाठी कोणी चिथावणी दिली याबाबत तपास करावयाचा आहे. 


या कारणास्तव राणा दाम्पत्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी अशी पोलिसांनी वांद्रे न्यायालयात केली.