अनिरुद्ध दवाळे, झी मराठी, अमरावती : दोन दिवसा पूर्वी झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलीच आगपाखड केली तसेच हिम्मत असेल तर राज्यातील सरकार पाडून दाखवाच अस थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिल्या नंतर आता बिहार निवडणूका संपल्या की हे सरकार आपोआप पडणार असून शिवसेना ही विरोधी पक्षात दिसेल असे भाकीत अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यतील भाषणावरर देखील राणा यांनी कडाडून टिका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवरही आता टिकेचे झोड उठवली आहे. यातच मागील काही महिन्या पासून मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी देखील टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्या निवळ भाजप वर टीका केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांन विषयी ते तिथे एक शब्द ही काहीच बोलले नाही.


विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याबाबत ते काहीच बोलले नाही. दहा हजार रुपयांचे जे पॅकेज जाहीर केले त्यातून महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना इंच भर ही चांगलं होणार नाही. शेतकऱ्यांना केवळ हेक्टरी दहा हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.



पंचवीस हजार रुपये हेक्टर व फळबागा ला पन्नास हजार रुपये हेक्टर मदत देणे गरजेचे होते. त्यात त्याची मर्यादा ही दोन हेक्टर ची केली. हे सर्वात मोठं महाराष्ट्राच दुर्भाग्य आहे. की आमच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे लक्षात येत नाही. मात्र त्यांनी दसऱ्या मेळाव्यात वारंवार सांगितल की हिंम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा पण मी सांगतो बिहार निवडणूका झाल्या की राज्यातील सरकार आपोआप पडेल आणि शिवसेना विरोधी पक्षात बसेल अस आमदार रवी राणा म्हणाले.