2000 Rupee Notes Banned in India : 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जारी केला आहे. सोमवार अर्थात 22 जानेवारी 2024 या दिवशी  आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने बँंकाना हाफ डे देण्यात आला आहे. यामुळे या दिवशी दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाणार नाहीत किंवा बदली देखील केल्या जाणार नाहीत.  रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील सूचना पत्रक जारी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 मे 2023 रोजी आरबीआयनं एक पत्रक काढत 2 हजार रुपयाच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. नोटा बदलण्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत वाढवण्यात आली. 2 हजार रुपयाच्या 97 टक्के नोटा परत आल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यापूर्वी जाहिर केले आहे. 


22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर


22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे 22 जानेवारीला सरकारी कार्यालयं, शाळा, कॉलेजेसना सुट्टी असेल. 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी अनेक आमदारांकडून करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारनं सुट्टीचा निर्णय जाहीर केलाय. 


अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान


अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान झालीये.  दरम्यान गणेश पूजनानं आजच्या विधीची सुरुवात झाली आहे. मंदिरात यज्ञयाग केला जातोय. त्यासाठी अरणिमन्थनातून अग्नि प्रकट करण्यात आला. द्वारपालांकडून सर्व शाखांचं वेदपारायण, देवप्रबोधन, औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास, कुण्डपूजन, पश्चभूसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अरणिमन्थनाद्वारे प्रकट झालेल्या अग्नीची यज्ञकुंडात स्थापना झाली. दरम्यान संध्याकाळी धान्याधिवास होऊन रामलल्लाची आरती करण्यात येईल.


राम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरु 


प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. तर अयोध्यानगरीही पूर्णपणे सजून गेली आहे. मंदिराला चोहोबाजूंनी नयनरम्य रोषणाई करण्याचं काम सुरू आहे. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरु आहे.