Reserve Bank Of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने एका बॅकेवर मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका को ऑपरेटर बँकेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. जर तुमचं या बँकेत अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे काढता येणार नाही. तसंच, तुम्ही कोणत्याही प्रकराचे कर्ज घेऊ शकणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारातही पैसे गुंतवू शकणार नाहीत. (Konark Urban Co-operative Bank)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळं रिझर्व्ह बँकेने मंगळवारी उल्हासनगर येथील कोणार्क को ऑपरेटिव्ह बँकेवर (Konark Urban Co-operative Bank) कारवाई केली आहे. आरबीआयने अनेक निर्बंध या बँकेवर लादले आहेत. 23 एप्रिलपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता सर्व बचत खाती किंवा ठेवीदारांच्या कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून रक्कम काढण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसंच, रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय नव्याने कर्ज देता येणार नाहीये. 


समोर आलेल्या माहितीनुसार, आरबीआयला कल्पना दिल्याशिवाय, नवीन गुंतवणूक, ठेवी स्वीकारणे, कोणत्याही प्रकारची मालमत्ता विकता येणार नाहीये. पण अटींची पूर्तता करुन ठेवींवर कर्ज काढण्याची परवानगी आरबीआयने दिली आहे. बँकेच्या ठेवीदारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण असणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे, बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसल्यास आरबीआयकडून हे निर्बंध मागे घेण्यात येऊ शकतात. बँकेची आर्थिक अवस्था सुधारण्यासाठी आरबीआयने ही कारवाई केली आहे. 


आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला नाहीये तर फक्त निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध बँकिग रेगुलेशन अॅक्ट 1949 कलम अतर्गंत 35A अतर्गंत लादण्यात आले आहेत. आरबीआयने लादलेले हे निर्बंध 23 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहेत. 


आरबीआयने काय म्हटलं?


भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे की, ही करावाई म्हणजे बँकेचा परवाना रद्द केलाय असे समजू नये. बँकेची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहे. या निर्बंधासह बँकेचे व्यवहार सुरू राहणार आहेत.