प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : ठेवीदारांच्या हिताला बाधा येण्याचा धोका आणि बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापूरातील दि सुभद्रा लोकल एरिया बँकेचा रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केला आहे. पण दुसरीकडे ठेवीदारांनी हावालदिल होवू नये ठेवी परत करण्या इतपत बँकेची आर्थिक परिस्थिती असल्याचं देखील रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात म्हटलंय.. त्यामुळे बँकेच्या  ठेवीदाराना एका अर्थाने दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दि सुभद्रा लोकल एरिया बँकेला 10 जुलै 2003 रोजी बँकिंग परवाना मिळाला होता..सुरुवातीला ही बँक कोल्हापूर जिल्हा मर्यादित होती, नंतर मात्र या बँकेचा कार्यविस्तार सातारा, सांगली, बेळगाव आणि पुण्या मध्ये वाढला. मात्र अनेक शाखा मधील काम हळू हळू कमी होवू लागलं आहे. त्यामुळे सद्याच बँकेचे कामकाज हे भविष्यात ठेवीदारांच्या हितास हानिकारक ठरेल आणि त्यातून ठेवीदारांच मोठं नुकसान होईल असा निष्कर्ष रिझर्व्ह बँकेने काढला.


2019 - 2020 च्या आर्थिक वर्षात बँक तिमाहिसाठी निव्वळ किंमत नियम पाळू शकली नाही असं देखील रिझर्व्ह बँकेन निरीक्षण नोंदवीत, रिझर्व्ह बँकेने दि सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द करत असल्याचे आपल्या आदेशात म्हटलं आहे. बँकेने या पुढे बँक नियमन कायदा 5 ब नुसार कसलेही व्यवहार करता येणार नसल्याचे सांगितले आहे



हे  सांगत असतानाच रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांनी हावालदिल होऊ नये ठेवीदारांचे पैसे परत करण्या इतपत बँकेची आर्थिक तरलता असल्याचं आपल्या आदेशात स्पष्ठ केलं आहे. त्यामुळे सध्यातरी दि सुभद्रा बँकेच्या ठेवीदाराला घाबरण्याचे कोणतेच कारण नाही.