पुणे : 'मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना (ShivSena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही, असं प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणचे मुख्यमंत्री मुंबईत आले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजपा पक्षांचं महागठबंधन तयार केलं होतं, भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. 


पण पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून 303 झालं होतं, भाजपाला बहुमत मिळालं होतं. 2024 लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या जागा यापेक्षा आणखी वाढतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 


पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.