रत्नागिरी : जलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. झी 24 तासनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांच्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालात कृषी सहाय्य्क पांडुरंग दुबळे, कृषी पर्यवेक्षक प्रकाश गोरीवले, मंडळ कृषी अधिकारी गुलाबसिंग वसावे आणि खेडचे तालुका कृषी अधिकारी सुरेश कांबळे यांचा समावेश आहे. विभागीय कृषी सहसंचालकांकडे निलंबनाची आणि खातेनिहाय चौरशीची शिफारस करण्यात आली आहे. दापोलीचे उपविभागीतय कृषी अधिकारी जांभुवंतराव घोडके यांनी खातेनिहाय चौकशीची शिफारस केली आहे.