मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये कोविड-१९ करिता तात्पुरत्या स्वरुपात दरमहा एकत्रित मानधनावर पदे भरण्याकरिता विशेष भरती मोहीम सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत , असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्धवलल्या कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर ही भरती करण्यात येणार आहे. समुपदेशक पदाची ४० पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती पदे हंगामी स्वरुपात सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


उमेदवारांनी आपले अर्ज वैद्यकीय मुख्य कार्यालय, दुसरा मजला, पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, पिंपरी ४११०१८ या पत्त्यावर दिनांक ३१ जुलै पर्यंत येऊन अथवा ई-मेलद्वारे (medical@pcmindia.gov,in) करु शकता. ही भरती पालिकेच्या कोविड-१९च्या रुग्णांकरिता सुरु करण्यात आलेली आहे. तसेच रुग्णालयासाठी करण्यात येणार आहे, असे पालिकेने दिलेल्या जाहिरातीत नमुद करण्यात आले आहे.


 समुपदेशक पदाची भरती


पदाचे नाव : समुपदेशक : ४० जागा


शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पदव्युत्तर पदवी


अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०


अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2X3WusI


अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आणि पत्ता : medical@pcmcindia.gov.in


वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी ४११०१८