मुंबई : Congress on Reduction in petrol and diesel prices in Maharashtra : राज्यातील सरकार जनतेच्या हिताचे आहे, असे सांगत आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकाने पेट्रोल-डिझेल दर कपात करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरुन काँग्रेसने भाजपला घेरले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना पेट्रोल-डिझेलवरुन भाजपने आवाज उठवला होता. थेट वॅटवर 50 टक्के कपातीची मागणी केली. आता पेट्रोल दर 5 रुपयांनी आणि  डिझेल दर 3 रुपयांनी कमी केले. त्यावेळच्या मागणीचे काय झाले, असे थेट सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्यामुळे किंमतीत कपात झाली. त्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकार दरावरुन घेरण्यात आले होते. त्यासाठी भाजपने पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला होता. आता भाजप-शिंदे गटाचे सरकार आहे. मग असे असताना तुमची मागणी तुम्ही का पूर्ण करु शकत नाही, असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत ( Sachin Sawant) यांनी उपस्थित केला आहे.


सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपला घेरले आहे. आज शिंदे फडणवीस सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये एवढीच कपात केली याचे आश्चर्य वाटते. मविआ सरकारकडे एकूण वॅटवर 50 टक्के कपात करा, म्हणजे एकूण पेट्रोल वरील 32.55 रुपयां पैकी 16.28 रुपये आणि डिझेल वरील 22.37 रुपयांपैकी 11.19 रुपये कमी करा, अशी भाजपाची मागणी होती. त्याचे काय झाले? याचा व्हिडिओ सचिन सावंत यांनी पोस्ट केला आहे.


'जवाब दो!'



केंद्रीय कराएवढे राज्याचे कर असावेत आणि राज्याचा कर केंद्रापेक्षा 10 रुपयांनी जास्त असल्याने महाविकास आघाडी सरकारमुळे महागाई वाढत आहे, असा आरोप फडणवीस करत होते. अजूनही केंद्रापेक्षा जास्त महाराष्ट्राचा कर आहेच. त्याचे काय? अजूनही गुजरात आणि कर्नाटकमधील दर फार कमी आहेत. त्याचे काय, असा सवाल सचिन सावंत यांनी ट्विट करुन विचारला आहे.