सागर आव्हाड, झी २४ तास पुणे: शौर्याची साक्ष देणारा लाल महाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "लाल महालात तमाशातल्या गाण्यांवर मुलींना नाचवून बदनाम केला जात आहे." असा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे. 
लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगर पालिकेकडून बंद ठेवला आहे. पुणे तसंच आसपासच्या परिसरातून अनेक जण जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात.


नेमका काय आहे संभाजी ब्रिगेडचा आरोप?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे महानगर पालिकेकडून लाल महाल बंद असताना. या लाल महालात रिल्स शूट केल्या जात आहेत. हे रिल्स चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर केले जात आहे. या रिल्समध्ये डान्स करणारी मानसी पाटील आणि रिल्स शूट करणारे कुलदीप बापट आणि 
आणि केदार अवसरे या दोघांनी शूट केले आहे. या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे . संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची तक्रार
पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे मनपा आयुक्त यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र पुणे पोलीस प्रशासन तक्रार दाखल करण्यास तयार नाही असं देखील संतोष शिंदे यांनी सांगितलं आहे. मुळात लाल महाल बंद प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. 
असं असताना ही तिघे आता गेले कसे? हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येतोय



लाल महाल ही वास्तू महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवप्रेमींसाठी एक श्रद्धास्थान आहे. राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांनी सोन्याचा नांगर चालवून पुणे शहर वसवलं होतं. शिवाजी महाराज या लाल महालात वास्तव्याला होते. 
इतकंच काय तर शिवाजी महाराज  यांनी शाहिस्ते खानाची बोटं याच लाल महालात छाटली होती.