सामूहिक भोजनदान, भंडारा आयोजीत करण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आता यापुढे...
आता यापुढे सरकारच्या पनवानगी शिवाय भंडारा किंवा भोजनदान करता येणार नाही. अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
Eating Bhandara: सामूहिक भोजनदान, भंडारा आयोजीत करण्यासंदर्भात सरकार मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सरकारच्या परवागीशिवाय अशा प्रकारे भोजनदानाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार नहीत. राज्यात आता सार्वजनिक प्रसाद आणि सामूहिक भोजनदान कार्यक्रम करताना परवानगी घ्यावी लागेल. अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ही घोषणा केली आहे.
राज्यात धार्मिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमाना दरम्यान सामूहिक भोजनदान केले जाते. अनेक दानशूर व्यक्ती देखील सामूहिक भोजनदान आयोजीत करतात. असा प्रकारच्या सामूहिक भोजनाला भंडारा असे म्हंटले जाते. मात्र, अलिकडे अशा प्रकारच्या सामूहिक भोजनदान कार्यक्रमादरम्यान विषबाधा झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू नये सासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक उत्सव आणि सामूहिक भोजनादरम्यान अन्नाची गुणवत्ता राखून विषबाधा सारखे प्रकार टाळण्यासाठी सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे..
राज्यात आता सार्वजनिक प्रसाद आणि सामूहिक भोजनदान कार्यक्रम करताना परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सार्वजनिक उत्सव आणि सामूहिक भोजनादरम्यान सरकारची परवानगी घ्यावी लागणार असल्यामुळे विषबाधेसारखे प्रकार टळू शकतात. कारण, कार्यक्रमाचे आयोजक, तसेच या कार्यक्रमात ठेवण्यात आलेले मेन्यू यांची नोंद सरकारकडे राहील. तसेच या पदार्थाची गुणवत्त देखील तपासली जाईल. परवानगी घेण्यात आयोजकांचा वेळ जाईल. मात्र, विषबाधेसारखे प्रकार टळू शकतात.
सरकारी नर्सिंग वसतिगृहातल्या 50 मुलींना अन्नातून विषबाधा
भंडारा शहारातील सरकारी नर्सिंग वसतिगृहातल्या 50 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे.. याबाबत हॉस्टेल प्रशासनानं मुलींना कॅमेरासमोर बोलायला मज्जाव केलाय. शुक्रवारी रात्रीपासून त्यांची तब्येत बिघडली. यापैकी अनेक मुलींवर अजूनही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चौकशीची मागणी मुलींच्या पालकांनी केलीय.