नांदेड : Nanded Murder : भाच्याने आपल्या मामाकडे लग्नासाठी त्याच्या मुलीला मागणी घातली. मात्र, मामाने भाच्याला नकार दिला. नकार मिळताच भाचा कमालीचा संतापला. त्याने रागाच्या भरात मामालाच संपविल्याची धक्कादायक घटना नांदेड येथे घडली. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे.(Rejection of Daughter for Marriage, the Nephew killed the Uncle in Nanded)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाच्याला मामाच्या मुलीसोबत लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने लग्नासाठी मामाकडे मागणी घातली, पण मामाने भाच्याला मुलगी देण्यास नकार दिला म्हणून भाच्याने कुऱ्हाडीचे घाव घालून मामाची हत्या केली. नांदेड जिल्ह्यातील मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाभरा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 


भाचा काही काम करत नाही म्हणून मामाने मुलगी दिली नसल्याने भाच्याचे लग्नाचे स्वप्नभंगले आणि भाच्याने मामाचा काटा काढला. या प्रकरणी आरोपी भाचा एकनाथ जाधव याला मनाठा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे 9 सप्टेंबर रोजी खुनाची घटना घडली. रात्री घराबाहेर झोपलेले बालाजी दिगंबर काकडे यांचा भाच्याने कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली.


याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी शोध मोहीम हाती घेतली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी भाचा एकनाथ जाधव याला अटक केली. आरोपी भाच्याने मामाचा खून केल्याचे कबूल केले आहे. 


चाभरा येथील बालाजी काकडे यांच्याकडे भाचा एकनाथ बंडू जाधव याने मुलीच्या लग्नासाठी मागणी घातली होती. पण तू काही काम करत नाहीस, असे म्हणत मामाने एकनाथला मुलगी देण्यास नकार दिला होता. मामा मुलगी देत नसल्याने मामा बद्दल राग मनात ठेवून भाच्याने कुऱ्हाडीने वार करुन मामाचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.