मुंबई : आगामी विधानसभेत नवी नातीगोती पाहायला मिळणार आहेत. भाऊभाऊ काकापुतणे मावसभाऊ बाप - बेटा अशा जोड्या आपल्याला विधानसभेत पाहायला मिळणार आहेत. निवडणूक निकालानंतर आता नवी विधानसभा अस्तित्वात येत आहे. या नव्या विधानसभेचं वैशिष्ट्ये म्हणजे अनेक नाती गोती या विधानसभेत पाहायला मिळणार आहेत. नातेवाईकांच्या अनेक जोड्या  विधानसभेत पाहायला मिळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूरकर भाऊभाऊ, विरारकर बापबेटे, सांगलीकर मावसभाऊ तर बारामतीकर काका पुतणे विधानसभेत पाहायला मिळणार आहेत. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख विजयी झालेत. तर लातूरमधून त्यांचे बंधू अमित देशमुख विजयी झालेत. अजित पवार यांचे पुतण्या रोहित पवार हे ही विधानसभेत पोहोचलेत. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूरही निवडून आला आहे.


सांगलीच्या जतचे विक्रम सावंत आणि कडेगाव पलूसचे विश्वजीत कदम हे मावसभाऊ आहेत. धीरज देशमुखांनी दोघं भाऊ मिळून चांगलं काम करण्याचा निर्धार केला आहे. मतदारांनी जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आपण तडा जाऊन देणार नाही, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. पवार काका पुतणे लोकांसाठी काम करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.


नातीगोती विधानसभेत पाहायला मिळाली तरी या आमदारांकडून सामान्य माणसांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करणे अपेक्षित आहेत. नाही तर या जोड्या पुढच्या विधानसभेत दिसणार नाहीत, याची तजविज जनता करेल हे वेगळं सांगायला नको.