मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे मात्र राज्य संकटात सापडलं होतं. मोठ्या प्रमाणात रेमेडिसीव्हीरची (remedicvir) मागणी वाढली आहे. नुकताच झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष केंद्रित केलं. पंतप्रधान मोदी (Pm modi) याआधी पत्राद्वारे विनंती करण्यात आली होती. आज केंद्र सरकारने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. याआधी राज्याला 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा पुरवठा होत होता. तो आता 4 लाख 35 हजार करण्यात आला आहे. (CM Uddhav Thackeray Thanks to PM modi)



आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र राज्य सरकारला प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की, 21 एप्रिल ते 31 एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे 16 लाख रेमीडिसीव्हीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून 7 परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.