नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त येवला तालुक्यातील राजापुर इथे शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजापुर परिसरातल्या सैन्यदलामध्ये असलेल्या ३५ ते ४० जवानांच्या कुटुंबिंयाचा सत्कारही करण्यात आला.


कुठे झाला कार्यक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपच्या वतीने तिरंगा यात्रेच्या माध्यमातून येवल्यातील राजापुर येथे संत जनादर्न स्वामी आश्रमामध्ये शहीद जवान पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करीत सैन्य दलातील जवानांच्या व शहिदांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. जे सैनिक स्वतःचे बलिदान देऊन या देशाचे रक्षण करीत आहेत, जे सैनिक डोळ्यात तेल घालून सीमेवर लढतात, त्यांच्या कुटुंबिंयाचा सन्मान होणे गरजेचे आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिरंगा रॅलीच्या माध्यमातून झेंडावंदन करून शहीदांच्या कुटुंबाचा सन्मान करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 


शहिदांच्या कुटुंबाचा सन्मान


काही समाजकंटक जाती व धर्माचा नावाने स्वतःचा झेंडा राबवून देशाचे विघटन करीत आहेत. परंतू तिरंगा यात्रेच्या माध्यमातून तिरंग्याचे सन्मान होणे गरजेचे आहे. ज्या शहिदांनी स्वतःचे बलिदान देऊन या देशाचे रक्षण केले. त्याच्या कुटुंबाचाही व जे सैनिक सिमेवर लढत त्यांच्या कुटुंबिंयाचा सन्मान होणे गरजेचे आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज तिरंगा रॅलीच्या माध्यमातून झेंडावंदन करून शहिदांच्या कुटुंबाचा सन्मान करीत आहोत, असे आयोजक दत्ता सानप  यांनी सांगितले. 


शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण


शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण या कार्यक्रमामुळे शहिद जवानांच्या कुटुंबियासह स्वतः सैन्यदलात असलेलेही भारावून गेले होते. शहिदांच्या कुटुबींयाचा व सैन्यदलातील कुटुंबिंयाचाही सन्मान केल्याने त्या कुटुंबींयाना अभिमान वाटेल आणि गावालाही अभिमान वाटेल असे मतही यावेळी जवानांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले.