पुणे : पार्किंग भागात ड्रेनेजचे पाणी सोडण्यावरुन आणि रस्त्यावरुन ये-जा करण्याच्या वादातून सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत महिलाही जखमी झाल्या असून दोन्ही बाजूंकडून हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण किती धक्कादायक होतं हे दिसून येत आहे. कारण यामुळे कोणाची जीव देखील जाण्याची शक्यता होती. दोन्ही इमारतीमधील लोकं एकमेकांवर तुटून पडले होते. ज्यामध्ये महिलांना ही मारहाण करण्यात आली आहे.



इमारतींमध्ये वादाच्या घटना या नव्या नाहीत. अनेक सोसायटींमध्ये वादाचं कारण हाणामारीत होतं. पण यामुळे कधी कधी कोणाची जीव जाण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकांने सांमजस्याने वाद मिटवले पाहिजे.