खंडाळा घाटातील वाहतूक हळूहळू पूर्ववत
रेल्वे प्रशासनानं युद्धपातळीवर कारवाई करत ही दरड हटवली असून रेल्वे वाहतूक धिम्या गतीनं सुरु करण्यात आलीये.
खंडाळा: कोसळलेली दरड हटविण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. अर्थात, वाहतुकीने अद्याप हवा तसा वेग घेतला नाही. मात्र, ती हळूहळू पूर्ववत होत आहे.
रेल्वे सेवा ठप्प
प्राप्त माहितीनुसार, खोळंबलेली पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक धिम्या गतीनं सुरु करण्यात आलीये. मंकीहील स्टेशनजवळ अप आणि मिड़ल या दोन्ही मार्गांवर शनिवारी दरड कोसळल्यानं रेल्वे सेवा ठप्प झाली होती.
दरड हटवली वाहतूक सुरू
रेल्वे प्रशासनानं युद्धपातळीवर कारवाई करत ही दरड हटवली असून रेल्वे वाहतूक धिम्या गतीनं सुरु करण्यात आलीये. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाय.