मुंबई : मुंबई, पुण्यासह उर्वरीत महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात आगामी २४ तासांत 'पवन' आणि 'अम्फन' ही चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा इशारा देण्यात आलाय. मुंबई, पुणे, नाशिक या भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होणं ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते. अम्फन चक्रीवादळ हे पूर्व-मध्य अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोवा आणि दक्षिण गुजरातच्या भागांत दिसू शकतो. 


तर, पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून, ते अगोदर उत्तर पश्चिम आणि त्यानंतर पश्चिम दिशेने पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग हा प्रतितास ४० ते ५० किलोमीटर राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.