नाशिक : गेल्या चार दिवसात नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. दिवसा कडक उन तर संध्याकाळी परतीचा जोरदार पाउस येतोय.  यामुळे निर्माण होणारे दमट वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक असल्याने स्वाईनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील स्वाईन फ्लू आटोक्यात येत असतानाच रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. सध्या जिल्हा रुग्णालयात बारा रुग्णावर उपचार सुरु आहे. यातील तीन रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून चार रुग्ण गंभीर आहेत. खोकला ताप सर्दी असल्यास तत्काळ तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात येतये.