कराडमध्ये `बैलगाडी`ऐवजी `रिव्हर्स ट्रॅक्टर` स्पर्धा
कराड : प्राणीमित्र संघटनांचा दबाव वाढल्यानंतर वर्षानुवर्षे सुरू असणाऱ्या बैलगाडी शर्यती अचानक ठप्प झाल्या. शर्यती लावणाऱ्यांनीही या बदलाला पर्यायी मार्ग शोधून काढलाय.
बैलगाडी स्पर्धेला पर्याय
साताऱ्यातील एका गावातही दरवर्षी बैलगाडी स्पर्धा व्हायची. पण आता ती बंद झालीए.
आजही त्या दिवशी स्पर्धा झाली. पण ही स्पर्धा थोडी वेगळी होती. बैलांच्याजागी ट्रॅक्टर धावताना दिसले.
विशेष म्हणजे स्पर्धेतील हे ट्रॅक्टर उलट्या दिशेने पळताहेत.
यात्रेचं निमित्त
साताऱ्यातील कराड तालुक्यात आगळीवेगळी रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा' पाहायला मिळतेयं. किल्ले सदाशिवगड राजमाची या ग्रामपंचायतीने या स्पर्धेचे आयोजन केल. सदाशिवाच्या यात्रे निमित्ताने ही स्पर्धा झाल्याचे कृषी मित्र सुरेश पाटील, सुभाष शंकरराव यांनी सांगितले.