महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हे; दोन नावं ऐकून बसेल धक्का!
Maharashtra : महाराष्ट्र हे भारतातील श्रीमंत राज्यापैंकी एक आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता?
Richest District In Maharashtra : महाराष्ट्र हे भारतातील भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. कमाईच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. भारताची आर्थित राजधानी असलेले मुंबई शहर हे आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. राज्याच्या आर्थित प्रगतीत या जिल्ह्याचे महत्वपूर्ण योगदान आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हे कोणते.
हे देखील वाचा... 8 तास ड्युटी, लंच ब्रेक, विक ऑफ, ओव्हर टाईम, भर पगारी रजा, बोनस आणि बरचं काही; फक्त एका कायद्यामुळे हे सर्व शक्य
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा हा भौगोलिक, आर्थिक, धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या वेगळा आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागात विभागणी करण्यात आली आहे. कोकणात मुंबई आणि ठाणे हे जिल्हे मोठे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर विदर्भात अमरावती आणि नागपूर असे सहा प्रशासकीय आहेत.
महाराष्ट्रातील काही जिल्हे खूपच श्रीमंत आहेत. देशाच्या इकॉनॉमीला याचा फायदा होतो
मुंबई
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांची यादी मध्ये मुंबई जिल्हा पहिल्या स्थानी आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, रिझर्व बँक ऑफ इंडिया यासारख्या प्रमुख वित्तीय संस्था तसेच फिल्मसिटी आहे. मुंबईचा एकूण GDP 12 लाख कोटी रुपये आहे.
पुणे
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. औद्योगिक, कृषी आणि सेवा क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. तसेच पुणे जिल्हा मोठा IT हब देखील आहे. या जिल्ह्यात GDP 3 लाख 68 हजार 478 कोटी रुपये इतका आहे.
ठाणे
मुंबईच्या जवळ असलेला ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादी तिसऱ्या क्रमांकांवर आहे. ठाणे जिल्हा हा मुंबई प्रमाणेच कोकण विभागात येतो. ठाणे एक मोठे उपनगर आणि महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर आहे. ठाणे जिल्ह्यात औद्योगिक इंडस्ट्रीज असल्यामुळे या जिल्ह्याचा विकास खूप वेगाने होतोय. ठाणे जिल्ह्याचा GDP 3 लाख 30 हजार कोटी रुपये इतका आहे.
नाशिक
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाशिक जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील हे महत्वाचे धर्मिक स्थळ आहे. येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. नाशिक जिल्ह्यात मुख्यतः द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वाईन निर्मितीसाठी नाशिक संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याचा GDP 1 लाख 83 हजार 718 कोटी रुपये इतका आहे.
नागपूर
नागपूर जिल्ह्याचा महाराष्ट्रातील श्रीमंत जिल्ह्यांची यादीमध्ये पाचवा क्रमांक लागतो. विदर्भात असलेला नागपूर जिल्हा महाराष्ट्राची टायगर कॅपिटल म्हणूनही ओळखला जातो. नागपूर संत्री साठी खूपच प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्ये नागपूर जिल्हयाचा वाटा आहे. या जिल्ह्याची GDP 1 लाख 81 हजार 665 कोटी रुपये इतकी आहे.