Maharashtra Richest Village : महाराष्ट्रात अनेक गावखेडी असून, काही गावं ही त्यांच्या वेगळेपणामुळं चर्चेचा विषय ठरतात. ही गावं अशी आहेत जी त्यांचं वेगळेपण जपत प्रगतीच्या वाटेवर अविरतपणे चालत आहेत. असंच एक कमाल गाव अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या गावात आरोग्य आणि धनधान्याची भरभराट... पण काही वर्षांपूर्वी मात्र हे चित्र असं नव्हतं. सध्या जिथं या गावात हिरवळ पाहायला मिळते तिथं की एकेकाळी रखरखाट होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात इतर गावांसाठी आदर्श ठरणारं आणि जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेलं हे गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार. या गावातील नागरिकांनी खऱ्या अर्थानं त्यांचं नशीब पालटलं असं म्हणायला हरकत नाही. 1990 च्या सुमारास इथं जवळपास 90 टक्के कुटुंबांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. पिण्याच्या पाण्याचीही या गावात सोय नसताना गावकऱ्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांच्या प्रयत्नांना मिळालेलं यशच या गावाच्या यशाचं गमक ठरलं. 


काही दशकांपूर्वी या गावात... 


कैक दशकांपूर्वी हिवरे बाजार हे गाव एक आनंदी गाव होतं, अगदी इतर गावं असतात तसं. 1970 हे दशक असं जेव्हा गावाची ख्याती हिंद केसरींचा गाव अशीही होती. पण, परिस्थिती बिघडली आणि 80-90 च्या दशकात या गावानं दुष्काळाचा सामना केला. पिण्यासाठीही पाणी उरलं नाही, नाईलाजानं अनेकांनी गाव सोडलं. वास्तविक गावात 93 विहीरी असूनही पाणीटंचाईचं संकट भीषण होतं. पुढे सुरु झाला जगण्याचा संघर्ष... 


1990 मध्ये गावात जॉईंट फॉरेस्ट कमिटी तयार करण्यात आली आणि याअंतर्गत विहिरी खोदण्यापासून वृक्षलागवडीसाठीची श्रमदानाची कामं सुरु करण्यात आली. 1994-95 मध्ये आदर्श ग्राम योजना आली आणि याअंतर्गत गाव वेगानं प्रगती करू लागलं. ज्या पिकांसाठी जास्त पाण्याची खपत होते अशा पिकांवर या समितीनं बंदी आणली. पाहता पाहता गावाती विहिरींची संथ्या 340 वर पोहोचली आणि जलस्तरातही वाढ झाली. 


हेसुद्धा वाचा : Lalbaugcha Raja: विसर्जनाच्या आधीच राजाच्या चरणी सापडली 'ती' चिठ्ठी; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?


 


हिवरे बाजार हे राज्यातील सर्वात श्रीमंत गाव असण्याचं कारण म्हणजे इथं 80 हून अधिक कुटुंब कोट्यधीश असून, 50 हून अधिक अशी कुटुंब आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे. या गावामध्ये दारिद्य्र रेषेसाठीचे वेगळे मापदंड आहेत. ज्यानुसार जी कुटुंब एका वर्षात 10 हजार रुपये खर्च करण्यात असमर्थ असतात त्यांची गणना या गटात होते. 


हिवरे बाजारच्या यशाचं गुपित सांगावं तर, इथं काही सूत्र आत्मसाद केली जाता असं सरपंचांचं म्हणणं.


ही सूत्र खालीलप्रमाणं.... 


  • वृक्षतोड न करणं 

  • कुटुंब नियोजन 

  • नशाबंदी 

  • श्रमदान 

  • हगणदारी मुक्त गाव 

  • भूजल पातळी नियोजन 


आहे की नाही कमाल या गावाची? मग इथं तुम्ही कधी भेट देताय?