अंबरनाथ : झाड पडून रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. विष्णू सोळंकी असं २२ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्देवी मृत्यू झालाय. अंबरनाथ पूर्व भागातल्या रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या मुख्य रिक्षा स्थानकाच्या कार्यालयावर झाड पडल्याने हा अपघात घडला. रिक्षा स्थानकावर कोसळलेल्या झाडाची फांदी विजेच्या तारेवर पडल्याने तार तुटून त्याठिकाणी उभ्या असलेल्या विष्णूच्या आंगावर पडली. विष्णुला विजेचा धक्का लागला आणि यात त्याचा जगीच मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातानंतर विजेची वाहिनी सुरूच राहिल्याने या रिक्षाचालकाला वाचविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.  विजेची वाहिनी बंद करेपर्यंत संबंधित रिक्षाचालकाने आपला जीव गमावला होता. या घटनेची माहिती मिळताच रिक्षाचालकांनी घटनास्थळी धाव घेत आपला संताप व्यक्त केला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हा अपघात घडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज अंबरनाथमध्ये रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा चालकांनी घेतलाय. 



तर मुंबईत चेंबूर येथे रिक्षानर भिंत कोसळल्याने रिक्षाचे मोठे नुकसान  झाले आहे. गोरेगाव पूर्वमधील इरवानी इस्टेट भागात राहणाऱ्या एकाच घरातल्या चार जणांना विजेचा धक्का बसला. या सर्वांना पोलिसांच्या मदतीने ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र त्यापैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. राजेंद्र यादव आणि संजय यादव अशी मृतांची नावं आहेत. तर अंधेरी पश्चिमेतल्या आरटीओ अन्नानगर ठिकाणी एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. 


दरम्यान, दादरमध्ये मीनाताई ठाकरे फुल मार्केटच्या भिंतीचा काही भाग कोसळून तीन जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गुरुवार रात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. तर शुक्रवार सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय. पावसामुळेच या दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.