शिवसेनेच्या आमदाराविरोधात रिक्षा चालकाची पोलिसात तक्रार
आमदारासमोर पोलीसही हतबल
औरंगाबाद :रिक्षाचालकला मारहाण प्रकरणी रिक्षा चालकाने आमदार अंबादास दानवे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी दुपारी क्रांती चौकमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे रस्त्यावर उतरलेले होते. (Rickshaw driver lodges complaint against Shiv Sena MLA Ambadas Danve at Aurangabad) यावेळी त्यांनी रिक्षाचालक अजय अशोक जाधव याना मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करुन आपली समाजात बदनामी केल्यामुळे मानहानी झाली आहे. काही एक चुक नसताना आमदाराने पोलिसांसमक्ष आपल्याला मारहाण केली असा आरोप त्यांनी केला आहे.
औरंगाबादेत वाहतूक कोंडी सोडवताना ऐकत नसलेल्या रिक्षा चालकाला आमदारांनी फटका दिला आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी या रिक्षा चालकाला कानाखाली मारलीय, चार वाजता सर्व व्यवहार बंद होणार म्हणून औरंगाबादच्या रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यात शहरातील क्रांती चौकामध्ये ट्रॅफिक जाम झाले होते.
ट्रॅफिक क्लियर करण्यासाठी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे रस्त्यावर उतरले मात्र ऑटो चालक आणि वाहतूक कोंडी करीत आहे हे पाहिल्यावर आमदार महाशयांनी थेट ऑटो चालकाला झापड मारली, ट्राफिक फार झाली होती लोक ऐकत नव्हते म्हणून रस्त्यावर उतरल्याच अंबादास दानवे यांनी सांगितले
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांवरुन औरंगाबादेतील नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. त्यामुळे दुपारी चार वाजेच्या आत घरी परतण्यासाठी औरंगाबादकरांची धावपळ पाहायला मिळाली.
एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या उतरल्यामुळे शहरातील मुख्य चौक असलेल्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी झाली. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसालही हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा जवळच्याच शिवसेना कार्यालयात उपस्थित असलेले आमदार महोदय क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत केली.