प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार: विरारच्या ग्लोबल सिटी मध्ये एका बँक कर्मचाऱ्याला रिक्षाचालकांच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुनीत मारवाह असं या जखमी कर्मचाऱ्याचे असून त्यांनी ग्लोबल सिटी येथील आपल्या एम एव्हेन्यू बिल्डिंगचा गेट अडवून नेहमी उभ्या असणाऱ्या रिक्षाचालकांना मज्जाव केला होता. या गोष्टीचा राग मनात धरून पाच ते सहा रिक्षाचालकांनी मिळून पुनीत यांना बिल्डिंग मध्ये घुसून मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अर्नाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी रिक्षा चालकांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारवरून रिक्षा चालकांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एरणींवर आला आहे. (rickshaw drivers misbehave with a bank employee for not allowing them in his building)


पाहा नेमका प्रकार ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या व्हिडीओतून (video) तुम्ही पाहू शकता की एक इसम रस्त्यावरून चालतो आहे. परंतु तेव्हाच अचानक चार-पाच तरूण येतात आणि त्याला बेदम मारहाण सुरू करतात. रागाच्या भरात ही मारहाण (fighting) ते करत आहेत. यावेळी त्याला लाथाबुक्क्यांनी मारण्यात येत आहे. तिथे आजूबाजूला जमलेले लोकं हा प्रकार पाहत बसलेले आहेत. लोकांचा जमाव हा प्रकार पाहून वाढू लागला. लोकांचा जमाव वाढू लागला तरी मारहाण करत असणाऱ्या या टोळीला कोणी ना थांबवायचा प्रयत्न केला नाही कोणी त्या पीडित बॅंक (bank) कर्मचाऱ्याच्या मदतीला आलं. सगळे आजूबाजूचे लोक हा प्रकार पाहून शांत बघत उभे होते. शेवटी त्याला होत असलेली मारहाण पाहून तिथे एक - दोन गृहस्थ त्याच्या मदतीला धावून आले आणि शेवटी त्याला उपचारांसाठी नेण्यात आले. हा इसम यात जखमी झाला असून मारहाण होण्याच्या क्षणी तो जमिनीवर अक्षरक्ष; जमिनीवर लोळत होता. 


हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना


पाहा व्हिडीओ -



काळजी घेणे आवश्यक - 


रागाच्या भरात खून करणं, मारपीट करणं असे अनेक प्रकार सध्या होताना दिसत आहेत. पोलिसांकडेही अशा तक्रारी येण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा प्रकारांमुळे कुणाशी साधं बोलणंही किंवा वागणंही कठीण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. या प्रकारातही आपण पाहू शकतो की फक्त आपल्या इमारतीच्या गेटमध्ये येण्यास रिक्षा चालकांना मज्जाव केला म्हणून सरळ त्या व्यक्तीनं त्याच्यावर हल्लाच चढवला. त्यामुळे सध्या सर्वतोपरी अशा घटनांपासून दूर राहणे शक्य नसले तरी आपण या अशा घटनांपासून सावधही (alertness) राहू शकतो.