दंगलीचा कट : राज्यातील सुरक्षेबाबतची बातमी, परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
Maharashtra Security and Police Alert : भोंग्यांवरुन राज्यात वातावरण तापलं असताना, परराज्यातून येऊन राज्यात दंगल घडवण्याचा प्लान (Riot plot) असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मुंबई : Maharashtra Security and Police Alert : भोंग्यांवरुन राज्यात वातावरण तापलं असताना, परराज्यातून येऊन राज्यात दंगल घडवण्याचा प्लान (Riot plot) असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.
दंगल घडविण्याचा कट असल्याने यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमकही सज्ज आहे. तर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावू यावर मनसे ठामच असल्याने मनसे नेत्यांचीही धरपकड सुरु आहे .
मशिदींमधून लाऊडस्पीकर न हटवल्यास आंदोलन सुरुच राहील, अशी धमकी राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क आहेत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
अनेक पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यालयात स्टँडबायवर ठेवले आहेत. दरम्यान, मनसेच्या आंदोलनासंदर्भात आतापर्यंत शहरात एकूण 7 गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी
दरम्यान, मनसेचे नेते पुढील आठवडयात अयोध्येला आढावा घेण्यासाठी जाणार आहेत. येत्या 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा असणार आहेत. भोंग्याविरुद्ध आंदोलनानंतर आता अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु झाली आहे. या दौरावेळी शरयू नदीच्या काठी, मनसे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणाहून मनसैनिक अयोध्यामध्ये दाखल होणार आहेत.