नागपुरात कोरोनाचा ( Nagpur Corona ) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे. आज नागपूरमध्ये कोरोनाच्या 1 हजार 979 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच नागपुरातील नव्या रुग्णांची संख्या आता 2 हजाराच्या घरात पोहोचू लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये 15 मार्च ते 21 मार्च लॉकडाऊन ( Nagpur Lockdown ) लावण्याबाबत आजच निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाची ( Covid 19 ) परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.


नागपुरात आज 10 कोरोनाग्रस्तांनी जीव गमावला आहे, तर 947 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आज वाढलेल्या 1 हजार 979 रुग्णांपैकी एकट्या नागपूर शहरातच 1 हजार 603 रुग्ण आहेत. तर शहरात आज 6 जणांचा बळी गेला आहे.


त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागपूरचे पालकमंत्री नितिन राऊत ( Nitin Raut ) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नागपुरातील लॉकडाऊनची घोषणा केली. नागपूरमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.


लॉकडाऊनमध्ये नेमकं काय बंद काय सुरू?


  • कडक संचारबंदी  लागू (Curfew)

  • उद्योग  सुरू राहतील

  • खासगी कार्यालये बंद

  • सरकारी  कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरू

  • वैद्यकीय सेवा सुरू राहतील

  • मार्च एंडिंगशी निगडीत लेखा विषयक कामांना परवानगी

  • माध्यम प्रतिनिधींनीही RTPCR चाचणी करून बाहेर निघावं

  • खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरू राहणार

  • जास्तीत जास्त लसीकरणावर भर देणार 

  • गृहविलगीकरणाच्या रुग्णांनी काटेकोर नियम पाळावे

  • शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई होईल