सावधान ! कोरोना संक्रमणचा पुन्हा धोका वाढला, आर काऊंट वाढतोय
Risk of corona infection : कोरोनाबाबत राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. कोरोना संक्रमणचा पुन्हा धोका वाढला आहे.
मुंबई : Risk of corona infection : कोरोनाबाबत राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. कोरोना संक्रमणचा पुन्हा धोका वाढला आहे. आर काऊंट वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पुणे ठाण्याचा आर काऊंट एक पेक्षा पुढे गेला आहे. त्यामुळे या शहरांत कोरोना संक्रमणचा वाढला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आर काऊट एकच्या अगदी जवळ पोहोचला आहे. (R count is increasing In Maharashtra)
राज्यात कोरोनाचा आर काऊंट 1च्या जवळ पोहोचला आहे. मुंबई- पुण्यात आर काऊंट 1 च्या पुढे गेला आहे. कोरोना संकट संपण्यासाठी आर काऊंट1 पेक्षा कमी आवश्यक आहे. मात्र, संक्रमित व्यक्तीद्वारे संसर्ग पसरवण्याचा दर पुन्हा वाढल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
कोरोना संक्रमण काहीसे नियंत्रणात येत असताना पुन्हा एकदा काळजीत टाकणारी बातमी आल्याने प्रशासनही हादरले आहे. मुंबई पुणे ठाण्याचा आर काऊंट एकपेक्षा पुढे गेलाय. देशात महामारी संपण्यासाठी आर काउंट एकपेक्षा कमी असला पाहिजे. महाराष्ट्रात या आठवड्यात आर काउंट 0.97 वर पोहोचला आहे. पुण्यात तर हा काउंट 1.13 वर पोहोचला आहे. तर मुंबई 1.10 वर आणि ठाण्यात सर्वात जास्त 1.19 आहे.