`विलासराव देशमुखांनी शिवसेना-भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली होती?` रितेश देशमुखने केले Fact Check
Riteish Deshmukh on Father Vilasrao Deshmukh: विलासरावांबद्दल केलेल्या दाव्याबद्दल त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने यासंदर्भात फॅक्ट चेक केले आहे.
Riteish Deshmukh on Father Vilasrao Deshmukh: गावचे सरंपच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास करणारा नेता विलासराव देशमुखांच्या रुपाने महाराष्ट्राला लाभला. एक असा नेता जो आपल्या स्मितहास्याने विरोधकांची मनेही जिंकून घेत होता. 26 मे 1945 रोजी बाभळगावच्या एका मराठी परिवारात विलारावांचा जन्म झाला. 1999 मध्ये ते मुख्यमंत्री झाले. दुसऱ्यांदा 20004 ते 2008 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते असलेल्या विलासराव देशमुखांनी एकदा कॉंग्रेस सोडली होती, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास पटेल का? असा दावा एक ट्विटर हॅंडलने केला होता. दरम्यान विलासरावांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने यासंदर्भात फॅक्ट चेक केले आहे. काय होते हे प्रकरण आणि काय आहे यामागची सत्यता? याबद्दल माहिती घेऊया.
काय करण्यात आला होता दावा?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव यांच्याबद्दल एक दावा सोशल मीडियात करण्यात आला होता. पण रितेश देशमुखने हा दावा खोडून काढला. मी भारतीय नावाच्या एका ट्विटर हॅंडलवरुन विलासराव देशमुखांबद्दल एक दावा केला होता. विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचे त्यांच्या मनातही आले नाही, असे रितेश देशमुख म्हणाल्याचे त्या ट्विटमध्ये सांगण्यात आले. त्यातच पुढे त्यांनी फॅक्ट नावाने स्पष्टीकरण देत विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणूकीत सेना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. असे म्हटले होते.
दावे प्रतिदावे
1995 हा विलासरावांच्या राजकीय कारकिर्दितील उतरता काळ होता. ते अपक्ष उमेदवार जनार्दन वाघमारे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक हरले होते. पुढच्या वर्षी त्यांनी अपक्ष निवडणूक लढली. यानंतर कॉंग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत पुढच्या 6 वर्षांसाठी निलंबित केल्याचा दाखला 'मी भारतीय' अकाऊंटवरुन पुढे देण्यात आला. दरम्यान विलासरावांना बाळासाहेबांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. पण माझ्या रक्तातील कॉंग्रेस तुम्ही कशी काढणार? असा प्रश्न त्यांनी बाळासाहेबांना विचारला. पराभव झाला तरी बेहत्तर पण कॉंग्रेस सोडणार नाही, असा दावा करणारी ट्विट देखील पुढे करण्यात आले.
रितेश देशमुखने काय म्हटले?
यावर रितेश देशमुख याने रिप्लाय केला होता. 'जा आणि आपला फॅक्ट चेक करा' असा रिप्लाय रितेश देशमुखने केला होता.
1975 पासून शेवटपर्यंत कॉंग्रेसमध्येच होते विलासराव देशमुख
विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री राहिले. ते केंद्रातदेखील मंत्री होते. तसेच ते राज्यसभेत खासदारदेखील होते. त्यांचा परिवार मराठवाड्यातील लातूरशी संबंधित आहे. विलासरावांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 1974 मध्ये झाली होती आणि 1975 मध्ये त्यावेळच्या उस्मानाबाद म्हणजे आताच्या धाराशीवचे जिल्हा युवा कॉंग्रेस अध्यक्ष बनले होते. 1980 मध्ये ते पहिल्यांदाच विधानसभेत निवडून गेले.
2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या घटनेनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला होता.यूपीए-2 मध्ये त्यांना केंद्रीय मंत्री बनवण्यात आलं. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं. त्यावेळी केंद्राच्या यूपीए सरकारमध्ये ते मंत्री होते.