पावसाचा धुमाकूळ । उत्तर महाराष्ट्रात जोरदार तडाखा; घरात आणि दुकानांत पाणी, नदीला मोठा पूर
Rain News, Rain In Maharashtra : नाशिक शहराला पावसानं चांगलेच झोडपून काढले. जुन्या नाशिकमधील अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणी घुसले होते. तर अहमदनगर शहरासह परिसरामध्ये रात्री जोरदार पाऊस पडला. तसेच कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक / अहमदनगर : Rain News, Rain In Maharashtra : नाशिक शहराला पावसानं चांगलेच झोडपून काढले. जुन्या नाशिकमधील अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणी घुसले होते. तर अहमदनगर शहरासह परिसरामध्ये रात्री जोरदार पाऊस पडला. जवळपास चार तास झालेल्या धुवांधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. दरम्यान, राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर शहरासह परिसरामध्ये रात्री जोरदार पाऊस पडला. यापावसाने सीना नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. शहराच्या पूर्व-उत्तर भागात रात्रभर पाऊस झाल्याने नदीच्या पाण्यात वाढ होत असून शहरातील कल्याण रोड आणि मालेगाव येथील नदीवर असलेले पूल पाण्याखाली गेलेत.
शहराच्या अगदी बाजूने सीना नदी वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी नदीपात्राच्या अगदी शेजारी अनेकांनी घरं बांधली आहेत. सीना नदीला पूर आला तरी महानगरपालिकेकडून नदीकाठच्या घरांना पुराबाबत कोणत्याही सूचना दिली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काल नाशिक शहरातही अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. यापावसाचा जोर एवढा होता की शहरातील दृश्य मानता कमी झाली. त्यामुळे संपूर्ण वाहने धीम्या गतीने सुरु होती. शहरातील अनेक रस्ते पाण्यात नागरिकांची तारांबळ झाली होती..जुन्या नाशिक मध्ये अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं.
तसचे पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड शहर आणि परिसरात रात्री मुसळधार पाऊस बरसला. जवळपास 85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच इथं अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतामध्ये, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी पाणीच पाणी झालं.