Rohit Pawar, Devendra Fadnavis: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) देखील पोहोचला होता. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी देखील क्रिकेट सामन्यासाठी हजेरी लावली. पहिल्या सामन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) एकत्र बसल्याचं पहायला मिळालं. तर दुसऱ्याकडे बारामतीत रोहित पवारांना धक्का बसल्याचं पहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अमोल काळे (Amol kale) यांच्यासोबत रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिसून आले. रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विट अकाऊंटवरून त्याचा एक फोटो देखील ट्विट केलाय. एकीकडे बारामतीत हालचाली सुरू असताना रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहिली. (Rohit Pawar and Devendra Fadnavis together in Wankhede and case against Executive Director of Baramati Agro latest marathi news)


काय म्हणाले रोहित पवार?


पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) इंडिया-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान (IND vs AUS) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अमोल काळे (Amol kale) यांच्यासोबतचा असाच एक क्षण, असं रोहित पवार (Rohit Pawar) ट्विट करत म्हणाले आहेत.


पाहा ट्विट-



बारामती ॲग्रोच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा 


भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सहा महिन्यांनंतर मुदतपूर्व गळीत हंगाम सुरु केल्याप्रकरणी बारामती अॅग्रो (Baramati Agro) साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 118 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


आणखी वाचा - धाराशिवमध्ये 250 कोटींचा भूखंड घोटाळा, कुणी खाल्लं बाजार समितीच्या भूखंडाचं श्रीखंड?


दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकीनंतर रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरून राजकीय धारेदोरे बांधले जातात का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीसांनी बसल्या बसल्या रोहित पवारांना क्लिन बोल्ड केलंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.